मोठी दुर्घटना : ट्रक आणि ट्रेलरचा भीषण अपघात, 13 जणांचा जागीच मृत्यू ; अनेक जखमी
मोठी दुर्घटना : ट्रक आणि ट्रेलरचा भीषण अपघात, 13 जणांचा जागीच मृत्यू ; अनेक जखमी
img
Dipali Ghadwaje
ट्रक अन् ट्रेलरची जोरदार धडक झाली असून भीषण अपघातात १३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. चौथिया छट्टीच्या कार्यक्रमावरून परत येताना काळाने घाला घातलाय. मृत लोक वाराणसीला एका कार्यक्रमावरून परत येत होते, त्यावेळी ही दुर्घटना घडली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , रायपुर-बलोदाबाजार रोडवर सारागांवजवळ हा अपघात झालाय. अपघातामधील जखमींना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  

रायपूर-बालोदाबाजार रस्त्यावर सारागावजवळ ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण अपघात. चौथिया छट्टीवरून परतताना झालेल्या या दुर्घटनेत १३ जण जागीच ठार, १२ जण गंभीर जखमी आहेत. ट्रक अन् ट्रेलरच्या अपघातामध्ये मृत झालेल्या १३ जणांमध्ये ९ महिला आणि चार मुलांचा समावेश आहे.

रायपुरचे एसपी लाल उम्मेद सिंह यांनी सांगितले की, चटौद गावातील काही लोक बंसरी गावात छठीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रमानंतर परतताना रायपुर-बलौदाबाजार रस्त्यावरील सारागांवजवळ त्यांच्या ट्रेलरची ट्रकशी जोरदार धडक झाली. या दुर्घटनेत १३ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १२ जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रायपुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चटौद गावातील एक कुटुंब बंसरी गावात पारिवारिक कार्यक्रमासाठी गेले होते. सारागांवजवळ परतताना मध्यरात्री हा अपघात घडला. ट्रेलर आणि ट्रक यांच्यातील धडकेत ट्रेलरमधील प्रवाशांवर काळाने घाळा घातला. मृतांमध्ये चार मुलांचा आणि नऊ महिलांचा समावेश आहे.  

रायपुरचे जिल्हाधिकारी गौरव कुमार सिंह यांनी सांगितले की, रविवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास अपघाताची माहिती स्थानिक आमदारांमार्फत मिळाली. प्रशासनाने तातडीने कारवाई करत जखमींना रुग्णालयात दाखल केले.  

दरम्यान, पोलिसांनी प्राथमिक तपासात ट्रक आणि ट्रेलरच्या चालकांच्या जबाबाची नोंद घेतली आहे. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group