बीडमध्येही दोन अपघातांमध्ये 10 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानांच अपघाताची आणखी एक घटना समोर आली आहे. कर्नाटकातील चिकबल्लापूर येथे भीषण रस्ता अपघात झालाय. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी 7.15 वाजता राष्ट्रीय महामार्ग 44 वर चित्रावती वाहतूक पोलीस ठाण्यासमोर हा अपघात घडला. या घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये 8 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रीय महामार्ग 44 वर समोरून येणाऱ्या टाटा सुमोने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. ट्रक आणि सुमो यांच्यात झालेल्या धडकेनंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे देखील काही प्रवाशांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, दाट धुक्यामुळे सुमो चालकाला रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक दिसला नाही आणि धडक बसली.
या अपघातात सर्व मृत व्यक्ती हे आंध्र प्रदेशातील श्री सत्य साई जिल्ह्यातील गोरंटला भागातील आहे. प्राथमिक तपासात एमयूव्ही आंध्र प्रदेशातून बंगळुरूकडे जात होती आणि दाट धुक्यामुळे वाहन चालकाला रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या ट्रकला त्याने धडक दिली.