लग्नानंतरची प्रेमप्रकरणं अनेकांची आयुष्य उद्धवस्त करणारी ठरत आहे. दिवसेंदिवस या प्रकरणांमध्ये मोठी वाढ होत आहे. कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यात
देखील बायकोच्या प्रेमप्रकरणामुळे नवऱ्याचा जीव जाता जात राहिला आहे.
नेमकं काय घडलं ?
कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यातील इंडी शहरात धक्कादायक घटना घडली. १ सप्टेंबरच्या मध्यरात्री बिरप्पा पुजारी अक्कमहादेवी नगरमधील त्याच्या भाड्याच्या घरात झोपला होते, अचानक त्याला जाग आली त्याला जाणवले की, एक माणूस बिरप्पाच्या छातीवर बसला असून त्याचा गळा दाबतोय. दुसरा जण त्याच्या पायावर बसून त्याच्या गुप्तांगावर हल्ला करतोय.
बिरप्पाने डोळे उघडले तेव्हा त्याला लाईट बंद होता, तो श्वास घेण्यासाठी सर्व ताकद लावून झगडत होता. त्यावेळी त्याचा पाय कूलरवर आदळला आणि एक मोठा आवाज झाला.तितक्यात बिरप्पाला त्याची पत्नी सुनंदाचा आवाज आला. ती तिच्या प्रियकराला, याला संपवून टाक, सोडू नकोस सिद्धू असे म्हणत असल्याचे बिरप्पाने ऐकले आणि त्याला जबर धक्का बसला.
तितक्यात घरमालक मल्लिकार्जुन सुतार आणि त्याची पत्नी राजेश्वरी यांनी आवाज ऐकला आणि ते घराबाहेर आले. त्यांनी दार वाजवायला सुरुवात केली. बिरप्पाचा मुलगा राकेशने रडत दार उघडले. त्यानंतर सुनंदा धावत बाहेर आली आणि घरमालकाला आत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. तिने त्यांना ढकलून दिले. तेव्हा बिरप्पाला दिसले की त्याचा गळा दाबणारा व्यक्ती सिद्धप्पा कटनाकेरी होता.
सिद्धप्पामुळेच त्यांच्या घरात वारंवार भांडणे होत होती. त्याच्यासोबत आणखी एक पुरूष होता ज्याचा चेहरा कापडाने झाकलेला होता, या हल्ल्यात बिरप्पा गंभीर जखमी झाला त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणात सुनंदाला अटक केली आहे, तर सिद्धप्पा फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहे.