मंदिरात उसळली गर्दी, शॉक लागल्याने , चेंगराचेंगरीत 20 जण जखमी
मंदिरात उसळली गर्दी, शॉक लागल्याने , चेंगराचेंगरीत 20 जण जखमी
img
Dipali Ghadwaje
कर्नाटकातील हासन येथील हसनंबा मंदिरात शुक्रवारी दर्शनासाठी रांगेत उभे असताना मेटल बॅरिकेडच्या संपर्कात आल्याने सुमारे 20 भाविकांना विजेचा धक्का लागला. यामुळे एकच खळबळ माजली आणि लोकांनी इकडे तिकडे पळण्याचा प्रयत्न केला. यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत काही भाविक जखमी झाले.

डेक्कन हेराल्डच्या वृत्तानुसार, ही घटना आज म्हणजेच शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. मेटल बॅरिकेडच्या संपर्कात आल्यानंतर रांगेत उभ्या असलेल्या काही लोकांना विजेचा धक्का लागल्याचे सांगण्यात येत आहे. भीतीमुळे अनेक भाविकांनी रांगेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळ आणि चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरीत काही जणांना किरकोळ दुखापत झाली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील एक रुग्ब गंभीर जखमी झाला आहे. तसेच इतर रुग्णांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. 

या घटनेकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भाविकांनी केला. लाइटिंगची तार तुटून बॅरिकेडला स्पर्श केल्याने लोकांना विजेचा धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर ही समस्या दूर करण्यात आली आणि काही वेळाने दर्शन नेहमीप्रमाणे सुरू झाले.

दरम्यान, या वेळी 2 ते 14 नोव्हेंबर दरम्यान वार्षिक हसनांबा जत्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात राज्यभरातून हजारो भाविक दररोज या मंदिरात दर्शनासाठी येतात.
इतर बातम्या
Join Whatsapp Group