"त्या" ठिकाणी मंदिर की मशीद? अखेर कोर्टाने दिला अत्यंत महत्त्वाचा निर्णय ; वाचा...
img
Dipali Ghadwaje
ठाण्याला लागूनच असलेल्या कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यासंदर्भातील महत्त्वाचा निकाल आज सत्र न्यायालयाने दिला आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर आहे की मशीद यासंदर्भातील निकाल न्यायालयाने दिला आहे.

दुर्गाडी किल्ल्यावर मंदिरच असल्याचा निर्वाळा न्यायालयाने केला आहे. मागील बऱ्याच काळापासून या प्रकरणार सुनावणी सुरु होती. अखेर या प्रकरणाचा निकाल आता लागला आहे.

कल्याणमधील सत्र न्यायालयाने ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर मशीद नसून मंदिरच असल्याचे आदेश जारी केले आहेत. 1971 साली ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांकडे मंदिर का मशीद या वरुन सुनावणी झाली होती. न्यायलयाने या किल्ल्यावर मंदिरच असल्याचं स्पष्ट केल्यानंतर हिंदू संघटनेचे पदाधिकारी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण दुर्गाडी किल्ल्यावर आरती करत केला जल्लोष साजरा केल्याचं पहायला मिळालं. 
 
अनेकदा या भागामध्ये धार्मिक तणाव निर्माण करणाऱ्या या प्रकरणावर निकाल लागल्याने आता हा वाद शांत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मागील काही वर्षांमध्ये बकरी ईदच्या निमित्ताने मुस्लिम समुदायाकडून दुर्गाडी किल्ला या भागात असलेल्या मशिदीत नमाज अदा केली जाते. मात्र या कालावधीत खबरदारीचा उपाय म्हणून मंदिर बंद ठेवलं जायचं. त्यामुळेच या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटना मोठ्या प्रमाणात आंदोलनं करायच्या.

या वर्षीही जून महिन्यात बकरी ईदनिमित्त मंदिर बंद ठेवण्यात आल्यानंतर दुर्गाडी किल्ल्याबाहेर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना अशा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन केलं होतं. 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group