इंडोनेशियातील जकार्ता येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. जकार्ता येथील एका शाळेच्या कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या मशिदीत नमाज पठण सुरू असताना एक भीषण स्फोट झाला. या स्फोटात ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या प्राथमिक तपासात घटनेच्या ठिकाणी अनेक वस्तू सापडल्या आहेत. यात बुलेटप्रुफ जॅके्टस, बंदुका आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्य तसेस रायफल्सचा समावेश आहे. दरम्यान स्फोटामुळे मशिदीचं कोणतेही मोठे नुकसान झाले नाहीये. जखमींना शोधण्यासाठी नातेवाईकांना मदत व्हावे यासाठी सेम्पाका पुतिह इस्लामिक आणि यार्सी हॉस्पिटल्समध्ये मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहे.
उत्तर जकार्ता येथील केलापा गाडिंग येथे हा स्फोट झाला असून तो कशामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहे. पोलिसांच्या मते रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्याची संख्या ५४ होती. यातील काहींची स्थिती गंभीर आहे.