धक्कादायक घटना :  फुग्यात हवा भरताना सिलेंडरचा स्फोट!  एकाचा मृत्यू , १२ मुलं जखमी
धक्कादायक घटना : फुग्यात हवा भरताना सिलेंडरचा स्फोट! एकाचा मृत्यू , १२ मुलं जखमी
img
Dipali Ghadwaje
लातूर :  लातूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फुग्यात हवा भरताना गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने विक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला तर १२ मुलं जखमी झाली आहेत. लातूर शहरातील तावरजा कॉलनीतील इस्लामपुरा भागात ही घटना घडली. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जखमींपैकी एक मुलगी ७० टक्के भाजल्याने तिची प्रकृती चिंताजनक आहे. लातूर शहरातल्या तावरजा कॉलनी भागातमध्ये रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. फुग्यात हवा भरणाऱ्या नायट्रोजन हेलियम गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात फुगे विक्रेत्याचा जागेवरच मृत्यू झाला. तर फुगे घेण्यासाठी आलेले १२ लहान मुले देखील गंभीर जखमी झाले आहेत.

राम इंगळे (वय 45) असं मयत फुगेवाल्याचं नाव आहे. बीड जिल्ह्यातल्या वाघाळा-राडी येथील तो रहिवासी होता. तो आज फुगे विकत लातूर शहरातल्या तावरजा कॉलनीत आला होता. मात्र फुग्यात हवा भरतानाचा सिलिंडरचा स्फोट झाला आणि ही दुर्दैवी घटना घडली आहे.

जखमी बालकांवर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान रात्री उशिरा जिल्हाधिकारी यांनी जखमी मुलांची भेट घेऊन विचारपूस केली. अशा अनधिकृत स्फोटक वस्तू घेऊन फिरणाऱ्या फेरीवाल्यांवर तात्काळ सरकारने बंदी घालावी, अशी मागणी जखमी मुलांचे पालक करत आहेत.

फुग्यात गॅस भरण्याच्या सिलेंडरचा नेमका कशामुळं स्फोट झाला याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, या घटनेमुळं एका व्यक्तीला प्राणाला मुकावं लागलं तर १२ चिमुकले गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group