धक्कादायक! जागेवर झोपल्याने आधी डोक्यात दगड टाकून हत्या केली अन् मग ...., नेमकं काय प्रकरण?
धक्कादायक! जागेवर झोपल्याने आधी डोक्यात दगड टाकून हत्या केली अन् मग ...., नेमकं काय प्रकरण?
img
Dipali Ghadwaje
लातूर : लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रात्रीच्यावेळी जागेवर झोपण्यावरून वाद झाला. या वादात दारूच्या नशेत भंगारवाल्याने माझ्या जागी का झोपला म्हणून डोक्यात दगड घालून हत्या केली. 

मिळालेल्या माहितीनुसार,  प्रकरणातील संशयित आरोपीला पाच तासात गजाआड केले आहे. लातूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत आज पहाटे एका अज्ञात इसमाच्या डोक्यात दगड घालत जाळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत सुरुवातीला संशयित आरोपी भंगारवाल्याला झोपेत दारू पिऊन मृताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याच मारहाणीचा राग मनात धरून संशयित आरोपीने मयत लक्ष्मण गजघाटे त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याची धक्कादायकी घटना घडली. यानंतर त्याला जाळून टाकले.

दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तपास सुरु केला. घटनेचा तपास करत असताना संशयित आरोपी सचिन वाघमारे याला लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या पाच तासात गजाआड केले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group