मुलीसाठी इडिली घेऊन जातो असे म्हणून एका वडिलांनी आपल्या मुलीचा गळा आवळून खून केला. यानंतर स्वत: देखील आत्महत्या केली. लातूर येथील मार्केट यार्ड लगत असलेल्या मोतीनगर भागात ही घटना बुधवारी घडली आहे. अभय लखन भुतडा (वय ३५) असे ६ वर्षीय मुलीचा खून करून आत्महत्या करणाऱ्या बापाचे नाव आहे. त्याने नेमक्या कोणत्या कारणाने आत्महत्या केली या बाबत माहिती समजू शकली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूतडा हे मोती नगर येथे राहतात. मार्केट यार्ड परिसरात त्याचे इडली गृह देखील आहे. मुलीसाठी इडली आणतो तसेच मुलीला शाळेत सोडतो असे सांगितले. दरम्यान अभय हा घराबाहेर पाडला. त्याने मुलीसाठी इडिली आणली. मात्र, त्याच्या मनात काय चालले याचा कुणालाही थांगपत्ता नव्हता. घरी येत त्याने मुलीचा गळा बेडशीटने आवळून तिला ठार केले. यानंतर स्वतः गळफास घेवून आत्महत्या केली.