मोठी दुर्घटना! नवस  फेडण्यासाठी जाणाऱ्या गाडीचा भीषण अपघात; पाच ठार, 11 जखमी
मोठी दुर्घटना! नवस फेडण्यासाठी जाणाऱ्या गाडीचा भीषण अपघात; पाच ठार, 11 जखमी
img
Dipali Ghadwaje
मुंबईतील परळ ब्रिजवरील अपघाताची घटना ताजी असतानाच पोहरादेवी येथे नवस फेडायला जाणाऱ्या वाहनाचा बेलगव्हान घाटात झाला आहे या अपघातात पाच जण ठार झाले आहेत तर 11 जण जखमी झाले आहेत. या घटनेतील जखमींवर मेडिकेअर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील पुसद दिग्रस मार्गावरील बेलगव्हान घाटातील लोकनायक बापूजी अणे स्मृती स्थळ नजीक मालवाहू वाहनाचा अपघात झाला. हा अपघात घडताच वाहनातील प्रवाशांच्या परिसरातील नागरिकांना किंचाळ्या कानावर पडल्या.

पाेलिसांकडून आणि घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर 11 जण जखमी झाले आहेत. या घटनेतील मृतक, जखमी हे पुसद तालुक्यातील मोहा तांडा , टोकि तांडा पांढुरणा सिंघनवाडी येथील आहेत. दरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण गेल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group