दैनिक भ्रमर : महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असणाऱ्या अथणी तालुक्यातील अनंतपूरमध्ये एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. येथील २० जणांनी जीव देण्याचा निर्णय घेतला आहे. हे २० जण ८ सप्टेंबर रोजी आपला देहत्याग करणार आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं लोकांनी देहत्याग करण्याचा निर्णय घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 'परमेश्वराच्या आदेशाप्रमाणे आम्ही वैकुंठाला प्रयाण करत आहोत,' अशी भूमिका २० जणांनी घेत देहत्याग करण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये पुण्यातील दहा भाविकांचा समावेश आहे. तर अनंतपूर आणि विजयपूर इथल्या प्रत्येकी पाच भक्तांनी देहत्यागाचा निर्णय घेतला आहे.अनंतपूर येथील एकाच इरकर कुटुंबातील पाच जणांनी देहत्यागाचा निर्णय घेतला. त्यामुळे आता आरोग्य विभाग आणि पोलीस विभाग त्यांची चौकशी करून त्यांना ताब्यात घेणार आहेत.
हे ही वाचा
मात्र यामध्ये पुण्यामधील १० भाविकांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. नावं समजताच त्यांची देखील आरोग्य विभाग आणि पोलीस विभाग चौकशी करून ताब्यात घेणार आहेत. देहत्याग करणाचा निर्णय घेणाऱ्यामध्ये मूळचे उत्तरप्रदेशचे असलेले पुण्यातील दहा, अनंतपूर व विजयपूर येथील प्रत्येकी पाच व्यक्तींचा समावेश आहे. हे सर्वजण रामपाल महाराजांचे शिष्य असल्याचे संगितले जात आहे. ६ ते ८ सप्टेंबरदरम्यान अनंतपूर येथे विशेष महापूजा आयोजित करण्यात आली आहे. तिचा समारोप देहार्पणाने केला जाणार आहे. हे सारे पाहण्यासाठी भक्तांचा मोठा समुदाय जमणार असल्याचे भाविकांनी सांगितले.
हे ही वाचा
दरम्यान , अन्य मठांच्या महाराजांनी सर्व भक्तांची समजूत काढल्याने देहत्याग करण्याचा निर्णय त्यांनी मागे घेतल्याचं बोललं जात आहे. पण तसे न झालयास जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासन ही घटना घडू नये म्हणून प्रयत्न करत आहे. मतपरिवर्तन न झाल्यास या कुटुंबावर कायदेशीर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.