काही लोकांना गड-किल्ल्यांवरची सैर करायला आवडते आणि आपला सांस्कृतिक वारसा जपायलाही आवडते परंतु काही हुल्लडबाज गडकिल्लयांच्या सैर करण्याच्या नावाखाली निव्वळ हुल्लडबाज पणा, मौज मस्ती आणि गडकिल्लयांवर मद्यपान असे गैरकृत्य
न्यूइयर जवळ येत असल्याने तो साजरा करण्यासाठी अनेकांचा किल्ल्यांकडे कल वाढणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या उपाययोजना करण्याचे ठरवले आहे. महाराजांनी बांधलेले किल्ले हे राज्याच्या सुवर्ण इतिहासाची साक्ष आहेत. त्यांचे पावित्र्य राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अशा ठिकाणी मद्यसेवन करुन गैरशिस्तीने वागल्याचे आढळून आल्यानंतर आता मोठी कारवाईला समोरे जावे लागेल.
गड-किल्ले आपला सांस्कृतिक वारसा आहेत. त्यांना संरक्षित करण्यासाठी राज्य सरकार नेहमी कोणती ना कोणती उपाययोजना करत असते. मात्र, तरीही काही हुल्लडबाज त्यांचे कारनामे थांबवताना दिसत नाहीत. दारू पार्टीकरणाऱ्यांविरोधात सरकारने कठोर निर्णय घेतला आहे. जर कोणीही किल्ल्यांवर दारू पार्टी केली. तर, त्याला शिक्षा केली जाणार आहे. तसेच त्यांना 1 लाख रुपयांचा दंडदेखील ठोठवला जाणार आहे. गड- किल्ल्यांचं पावित्र्य राखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान , याआधी सरकारने गड किल्ल्यांच्या संरक्षणासाठी ठोस पावले उचलावीत यासाठी संभाजीराजे यांनी जुलै महिन्यात देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने याप्रकरणी निर्णय घेतला आहे.