नाशिक मनपाने गणेशोत्सव मंडळांच्या परवानगी फीबाबत घेतला
नाशिक मनपाने गणेशोत्सव मंडळांच्या परवानगी फीबाबत घेतला
img
दैनिक भ्रमर
दैनिक भ्रमर : नाशिक महानगरपालिका हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी घेण्यासाठी आकारण्यात येणारी फी माफ करण्याचा निर्णय नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी घेतला आहे.

हे ही वाचा 
आजचे राशिभविष्य ! २५ ऑगस्ट २०२५ , आजचा वार सोमवार ; प्रमोशन मिळणार की नाही… आज काय सांगते तुमची रास ? वाचा

या निर्णयामुळे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळणार असून गणेशोत्सव अधिक उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा होण्यास मदत होईल. नाशिक महानगरपालिका दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव शांतता, सुरक्षितता व पर्यावरणपूरक रीतीने पार पडावा यासाठी आवश्यक ती सर्व तयारी मनपा करत आहे. नागरिकांनीही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मनपाच्यावतीने करण्यात आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group