सीबीएस सिग्नल ते कॅनडा कॉर्नर सिग्नल या मार्गावर 18 महिन्यांसाठी एकेरी वाहतुक राहणार
सीबीएस सिग्नल ते कॅनडा कॉर्नर सिग्नल या मार्गावर 18 महिन्यांसाठी एकेरी वाहतुक राहणार
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- रस्त्याच्या कामासाठी सी. बी. एस. सिग्नल ते कॅनडा कॉर्नर सिग्नल हा 1300 मीटर रस्ता 18 महिन्यांसाठी एका बाजूने बंद करण्यात येणार असून, त्या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे.

हा रस्त्यावर दि. 8 एप्रिल 2024 ते दि. 8 नोव्हेंबर 2025 या 18 महिन्यांच्या कालावधीसाठी एकेरी वाहतूक राहणार आहे.
या मार्गावर टप्प्याटप्प्याने रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम मनपाने हाती घेतले आहे. या मार्गावरील वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी आणि जनतेची गैरसोय टाळण्यासाठी शहर वाहतूक विभागाने वरील आशयाची अधिसूचन आज पारित केली आहे.

प्रवेश बंद असलेले मार्ग
कॅनडा कॉर्नर सिग्नल, शरणपूर रोडने सी. बी. एस. सिग्नलकडे राजीव गांधी भवन, टिळकवाडी सिग्नल मार्गे, सिव्हिल हॉस्पिटल, ठक्कर बझारकडून किशोर सुधारालय, मेळा बस स्थानक मार्गे सी. बी. एस. कडे येणारे सर्व रस्ते, जलतरण तलाव सिग्नलकडून टिळकवाडी सिग्नलमार्गे सी. बी. एस. कडे जाणारा रस्ता, राका कॉलनीकडून सी. बी. एस. कडे येणारे सर्व रस्ते, कुलकर्णी गार्डनकडून सी. बी. एस. कडे येणारे सर्व रस्ते, ठक्करनगरकडून कुलकर्णी गार्डनमार्गे सी. बी. एस. कडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक, नवीन पंडित कॉलनीकडून सी. बी. एस. कडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक, जुनी पंडित कॉलनीकडून लेन क्रमांक 1, 2, 3, माधवबाग क्लिनिक, टिळकवाडी सिग्नल मार्गे सी. बी. एस. कडे जाणार्‍या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येणार आहेत.

पर्यायी मार्ग
कॅनडा कॉर्नर सिग्नलकडून शरणपूर रोडने सी. बी. एस. सिग्नलकडे जाणारी वाहतूक, कॅनडा कॉर्नर-जुना गंगापूर नाका-मॅरेथॉन चौक-अशोकस्तंभ मार्गे इतरत्र जाईल किंवा कॅनडा कॉर्नर ते एचडीएफसी सिग्नल-जुने सीटीबी सिग्नल-मायको सर्कल-जलतरण तलाव सिग्नल-मोडक सिग्नल मार्गे इतरत्र जातील.

शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने 76 लाखांची फसवणूक

एकेरी मार्ग
सी. बी. एस. सिग्नल ते कॅनडा कॉर्नर सिग्नलकडे टिळकवाडी सिग्नलमार्गे जाणारी वाहतूक एकेरी करण्यात येत आहे.
ही वाहतूक रस्त्याच्या टप्प्याटप्प्याने होणार्‍या कामानुसार एकेरी मार्गाने सी. बी. एस. ते कॅनडा कॉर्नर अशी सुरू राहील.

नो पार्किंग झोन
सी. बी. एस. सिग्नल ते कॅनडा कॉर्नर सिग्नल या रस्त्याच्या दोन्ही बाजूंस 18 महिन्यांकरिता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी ‘नो पार्किंग झोन’ करण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group