शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने 76 लाखांची फसवणूक
शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने 76 लाखांची फसवणूक
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शेअर मार्केट ट्रेडिंगच्या बहाण्याने जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून अज्ञात दोघांनी 5 जणांची 76 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी राजेश धरमदास सचदेव (वय 54, रा. जुना गंगापूर नाका) व इतर साक्षीदार यांना 919008511992, तसेच इतर व्हॉट्सॲपधारक व्यक्तीने फोन केला. त्यांना के. के. आर. प्रो. या मोबाईल ॲपमध्ये इन्स्टिट्यूशनल अकाऊंटच्या माध्यमातून स्टॉक मार्केटिंग ट्रेडिंगचा बहाणा करून बोलत असल्याचे सांगितले.

त्यानंतर स्टॉक मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यावर फिर्यादी राजेश सचदेव व इतर साक्षीदारांचा विश्वास बसला. त्यानंतर डिसेंबर 2023 ते दि. 27 फेब्रुवारी 2024 दरम्यान अज्ञात व्हॉट्सॲपधारक व्यक्तीने फिर्यादी सचदेव व त्याच्या साक्षीदारांना फोनद्वारे व इंटरनेटद्वारे वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगितले.

त्यानुसार फिर्यादी सचदेव व इतर साक्षीदारांनी वेळोवेळी सुमारे 76 लाख 16 हजार 805 रुपयांची रक्कम आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यात जमा केली; मात्र मोठ्या प्रमाणात रक्कम गुंतवूनही अपेक्षित फायदा किंवा नफा मिळत नसल्याने फसवणूक झाल्याची बाब लक्षात आली. त्यानंतर फिर्यादी सचदेव यांनी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली आहे. 

crime | fraud |
इतर बातम्या
Join Whatsapp Group