धक्कादायक बातमी : शिवसेना ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाचे अपहरण ; नेमकं काय घडलं? वाचा
धक्कादायक बातमी : शिवसेना ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाचे अपहरण ; नेमकं काय घडलं? वाचा
img
Dipali Ghadwaje
नांदेड : नांदेडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख गौरव कोटगीरे यांचे शुक्रवारी बंदूक दाखवत अपहरण करण्यात आले. 

मिळालेल्या माहितीनुसार , या प्रकरणात त्यांच्या पत्नीने इतवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. शहर प्रमुख गौरव कोटगिरे हे काही कामानिमित्त बाफना भागात गेले होते. यावेळी बंदूक घेऊन काही जण त्यांच्या जवळ आले अन् त्यांचं अपहरण केले, असा आरोप त्यांची पत्नी गायत्री यांनी केला आहे. या प्रकरणात इतवारा पोलीस तपास करीत आहेत. 

दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोटगिरे यांनी विरोधी पक्षावर आरोप केले होते. तसेच, कोटगिरे हे कट्टर शिवसैनिक असून ते सोशल मीडियावर ही सक्रिय असतात. अशातच पुन्हा एकदा अपहरणाची  घटना घडल्याने राज्यात कायदा आणि  सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group