धक्कादायक! रुग्णालयात डॉक्टरनेच केली महिला रुग्णाची छेडछाड ;  कुठे घडली घटना?
धक्कादायक! रुग्णालयात डॉक्टरनेच केली महिला रुग्णाची छेडछाड ; कुठे घडली घटना?
img
Dipali Ghadwaje
बीडच्या परळीत एक धक्कादायक घटना घडली आहे. परळीत एका खाजगी रुग्णालयात एका महिला पेशंटची छेडछाड करण्यात आली आहे. एका २१ वर्षीय महिला पेशंटची छेडछाड करण्यात आली आहे. याप्रकरणी डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , परळी शहरातील खाजगी रुग्णालयात ही घटना घडली आहे. या संतापजनक घटनेनंतर पीडित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. महिलेच्या कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेद केला आहे. 

याप्रकरणी डॉक्टरवर करावाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून परळी शहर पोलिस ठाण्यामध्ये डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल करुन घेतली आहे. पोलिसांनी आरोपी डॉक्टरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान या घटनेनंतर डॉक्टरवर कारवाई करण्यात यावी, यासाठी नागरिकांनी परळी शहर बंदची हाक दिली आहे. यामुळे आज सकाळपासूनच परळी शहर बंद असल्याचे पाहायला मिळत आहे. व्यापऱ्यांनीही दुकाने बंद ठेवली आहे. महिलेवर झालेल्या या अत्याचारासाठी परळीकर एकत्र आले आहे.  
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group