इगतपुरी : मानवी आरोग्याच्या दृष्टीने गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि मानवी आरोग्यास हानिकारक खाद्यपदार्थांची विक्री, उत्पादन, साठवणुक, वाहतुक आदी व्यवसायांना प्रतिबंधीत करण्यात आलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर गुटख्याची वाहतूक, विक्री, वितरण व साठवणूक करणाऱ्यांविरूध्द कारवाई सुरू आहे.
त्यानुसार आज इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीत समृद्धी महामार्गावरील टोलनाक्याच्या जवळ असलेल्या पुलाखाली गुटखा वाहतुक करीत असलेला टाटा ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे. ह्या मालवाहू ट्रकमध्ये गुटख्याची अवैधरित्या वाहतुक करून विक्री करण्याचे उद्देशाने जाणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांना मिळाली होती.
ह्या बातमीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने छापा टाकून टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक RJ 11 JC 0091 ताब्यात घेतला आहे. महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला, टाटा ट्रक आणि मोबाईल असा एकूण १ कोटी ५३ लाख ५४ हजार किमतीचा मुद्धेमाल जप्त करण्यात आला आहे.
ट्रक चालक अरमान शोहराब खान वय २० रा. नुहू हरियाणा या आरोपीविरुद्ध इगतपुरी पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.