Nashik : लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात
Nashik : लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात
img
दैनिक भ्रमर
नाशिक :- एक हजार रुपयांची लाच घेताना तलाठ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
बापू वामनराव पवार (वय ५४), तलाठी महसूल अधिकारी, सजा नगरसूल अति. कार्यभार कुसमाडी ता. येवला जि. नाशिक वर्ग-3 असे लाच घेणाऱ्याचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी त्यांचे वडिलोपार्जित शेत पत्नी व मुलाच्या नावे दुय्यम निमधक यांचेकडे दस्त नोंदणी केली होती. त्याची नोंद ७/१२ उताऱ्यावर लावण्यासाठी तक्रारदार यांनी बापू पवार यांचेकडे दिली होती. परंतू सदरची नोंद मुलाचे नाव चुकल्याने रद्द झाली होती. ती दुरुस्त करून ७/१२ उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी बापू पवार यांनी त्यांच्यासाठी १००० रुपये व मंडळ अधिकारी यांचेसाठी ५०० रुपये लाचेची मागणी करून नोंद करण्यासाठी प्रथमतः १००० रुपये लाच स्वतःसाठी स्विकारली असता, त्यांना रंगे हाथ पकडण्यात आले. त्यांच्या विरुध्द येवला तालुका पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7,7a अन्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.   

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक श्रीमती स्वाती पवार, पो. हवा शरद हेंबाडे, पो. ना युवराज खांडवी, पो.  हवालदार  विनोद पवार यांनी केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group