तामिळनाडूची राजधानी चेन्नईमधील अण्णा विद्यापीठात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. कॅम्पसमध्येच विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
एका वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तनुसार , विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी याप्रकरणी विद्यापीठाच्या बाहेर बिर्यानी विकणाऱ्या हातगाडीवाल्याला अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.
चेन्नईमधील अण्णा विद्यापीठाच्या कॅम्पस मध्ये बुधवारी सकाळी इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षातील विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आला.
त्याआधी दोन जणांनी तिच्या मित्रांना बेदम मारहाण केली होती. ती विद्यार्थीनी मित्रासोबत कॅम्पसमधील एका ठिकाणी गप्पा मारत बसलेली होती. त्यावेळी दोन जणांनी विद्यार्थीनिच्या मित्रांवर हल्ला केला. त्यानंतर तिला झुडपात ओढल अन् लैगिंक अत्याचार केले. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली.
पोलिसांनी याप्रकरणी ३७ वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तो विद्यापीठाच्या बाहेर हातगाड्यावर बिर्यानी विकतो, असं तपासात समोर आलेय.
अण्णा विद्यापीठात विद्यार्थिनीवरील बलात्काराच्या या घटनेनंतर संपूर्ण चेन्नई हादरली आहे. याबाबत विद्यार्थिनीनेच पोलिसांत तक्रार केल्याने हा प्रकार उघडकीस आला.