गेल्या काही दिवसांपासून विमानतळावर महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने मोठ्या प्रमाणात सोनं जप्त केल य. अशातच आज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुन्हा एकदा सोने जप्त करण्यात आले आहे. डिजेच्या लाईटमधून सोन्याची तस्करी केली जात होती. महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने डिजेच्या लाईटमधून तब्बल १२ किलो वजनाचे सोनं जप्त केले आहे. याची किंमत ९.६ कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान आज करण्यात आलेल्या कारवाई बाबत अधिकाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली होती. डिजेच्या लाईटमधून सुद्धा सोन्याची तस्करी केली जाते अशी गृप्त माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी गोदाम शोधून तेथील डीजेचे लाईट तपासले.
सोन्याच्या तस्करीसाठी वापरल्या जाणाऱ्या पोकळ्यांसह ६८ डीजे लाईट सापडले. यात एकून १२ किलो वजनाचे ९.६ कोटी रुपयाचे सोने डीआरआय विभागाने जप्त केलंय.
सोन्याच्या तस्करी प्रकणात दोन जणांना अटक करण्यात आलीय. गेल्या आठवड्यात डीआरआय मुंबईने सोन्याची तस्करी करणाऱ्या सिंडिकेटच्या विरोधात उल्लेखनीयक कामगिरी केलीय. डीआरआयने गेल्या आठवड्यात सुमारे ४८ किलो तस्करीचे सोने जप्त केले आहेत.