सोन्या-चांदीचा पुन्हा खणखणाट ! आजचे दर किती ?
सोन्या-चांदीचा पुन्हा खणखणाट ! आजचे दर किती ?
img
वैष्णवी सांगळे
सोने चांदीचे दर दररोज बदलताना दिसत आहे. आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात २,२४० रुपयांनी वाढ झाली आहे. आज २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी १,५८,८४० रुपये खर्च करावे लागणार आहेत. रविवारी १ तोळा सोनं १,५६,६०० रुपयांना विकले गेले. 

आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये २,०५० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,४५,६०० रुपये खर्च करावे लागणार आहे. रविवारी हे सोनं १,४४,५५० रुपयांना विकले गेले.

२४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. आज १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात १,६८० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,१९,१३० रुपये खर्च करावे लागतील. रविवारी हे सोनं १,१७,४५० रुपयांना विकले गेले.

दरम्यान, सोन्यापाठोपाठ आज चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. आज १ ग्रॅम चांदीच्या दरात १५ रुपयांनी वाढ झाली आहे. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला ३०० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर १ किलो चांदीचे दर तब्बल १५,००० रुपयांनी वाढले आहेत. ही चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला ३,००,००० रुपये खर्च करावे लागणार आहे.

१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर -

मुंबई - १५,८८४ रुपये

पुणे- १५,८८४ रुपये

अहमदाबाद - १५,६६४ रुपये 

दिल्ली - १५,६७४ रुपये

चेन्नई - १५,९८२ रुपये

हैदराबाद - १५,८८४ रुपये
इतर बातम्या
Join Whatsapp Group