सोन्याचे भाव धडाधड कोसळले ! आता सोने - चांदीचे नवे दर काय?
सोन्याचे भाव धडाधड कोसळले ! आता सोने - चांदीचे नवे दर काय?
img
Nandini khandare More

गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावाने इतकी उंच गगनभरारी घेतली होती की ,सोन खरेदी हे सर्वसामान्यांच्या अवा क्याच्या बाहेर गेलं होत. परंतु आजची ही बातमी वाचून सामान्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 

गेले काही दिवस सातत्याने सोन्याच्या दरात वाढ सुरूच होती, परंतु आता सोन्याच्या दरात घसरण सुरू झाल्याचं पहायला मिळत आहे. सोन्याचा दर प्रति तोळा 1 लाख 70 हजारांच्या आसापास पोहोचला होता, मात्र आता सोन्याचे दर प्रति तोळा दीड लाखांपेक्षा कमी झाले आहेत.

सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे, आज देखील सोन्याचे दर कमी झाल्याचं पहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात प्रति तोळ्या मागे तब्बल एक हजार 500 रुपयांची घसरण झाली आहे. 

जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्यानं आता सोन्याचे दर प्रति तोळा जीएसटीसह 1 लाख 47 हजार 290 रुपयांवर आले आहेत. 

तर दुसरीकडे चांदीचे दर मात्र स्थिर आहे, चांदीच्या दरात कोणतंही घसरण झालेली नाहीये, किंवा ते वाढलेले देखील नाहीत. जळगावच्या सराफा बाजारात सध्याचे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो 2 लाख 31 हजार 750 रुपये एवढे आहेत.  


gold |
इतर बातम्या
Join Whatsapp Group