सोने पुन्हा महागले, सणासुदीच्या तोंडावर खिशाला कात्री,  आजचे दर काय जाणून घ्या
सोने पुन्हा महागले, सणासुदीच्या तोंडावर खिशाला कात्री, आजचे दर काय जाणून घ्या
img
वैष्णवी सांगळे
सोने-चांदीच्या दरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून चढ उतार सुरूच आहे. आता पुन्हा एकदा सोने आणि चांदीचे दर वाढले असून ऐन सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. गेल्या २४ तासांत सोने चांदीच्या दरांनी जोरदार उसळी घेतली आहे. सोन्याच्या दरात सुमारे २ हजार रुपयांची वाढ झाली असून, जीएसटी वगळता दर १,५३,००० रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीच्या किमतीतही तब्बल ४ हजार रुपयांची वाढ होऊन दर २,५६,००० रुपयांवर गेले आहेत. 

सुवर्ण बाजारपेठेत मंगळवारी सोने, चांदी दरात मोठी वाढ नोंदवली गेली होती.  आता सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यानंतर पुन्हा दोन्ही धातुंचे दर वधारल्याने ग्राहकांमध्ये खळबळ उडाली.  आज ,१५ एप्रिल रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम सुमारे १,५३,९४० रुपये असून, २२ कॅरेट सोन्याचा दर १,४१,११० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. चांदीच्या बाबतीत मात्र काही प्रमाणात चढ-उतार सुरू आहेत. देशात चांदीचा सध्याचा दर प्रति किलो सुमारे २,५४,९०० रुपये असून, गुंतवणूकदारांकडून नफा वसुलीमुळे किंमतीत किरकोळ बदल दिसत आहेत.

आजचे दर (राष्ट्रीय स्तरावर)
२४ कॅरेट सोने – १,५३,९४० रुपये (प्रति १० ग्रॅम)
२२ कॅरेट सोने – १,४१,११० रुपये (प्रति १० ग्रॅम)

चांदी – २,५४,९०० रुपये (प्रति किलो)
१०० ग्रॅम – २५,९४० रुपये
१० ग्रॅम – २,५४९ रुपये

सोन्याची दरवाढ (जळगाव)
१,५१,००० रुपये → १,५३,००० रुपये
वाढ – २,००० रुपये

चांदीची दरवाढ (जळगाव)
२,५२,००० रुपये → २,५६,००० रुपये
वाढ – ४,००० रुपये

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा या दरवाढीवर मोठा परिणाम होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य चर्चांमुळे डॉलर कमजोर झाला आहे. डॉलर घसरल्यास सोने जागतिक बाजारात स्वस्त ठरते, त्यामुळे त्याची मागणी वाढून दरात वाढ होते. याशिवाय देशात बैसाखी, पोइला बोईशाख आणि अक्षय तृतीया यांसारख्या सणांमुळे सोन्याची मागणी वाढल्यानेही दरात तेजी आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group