इराण अमेरिका संघर्षाने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. त्यामुळे महागाई वाढली असून गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या चांदीच्या दारात अनेक चढ उतार होत असून आज पुन्हा एकदा सोने आणि चांदीच्या किंमतीत काहीशी घसरण पाहायला मिळाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरची मजबुती आदी कारणांमुळे सराफा बाजारात उलटफेर झाल्याचे दिसून आले. गुरुवारी देखील सोन्याच्या दरात चढ-उतार असल्याचे दिसून आले. आजही
सोन्याचे दर घसरल्याने ग्राहकांकडून सोने खरेदी होण्याची शक्यता आहे
मिळालेल्या माहितीनुसार, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) आगामी ५ जूनच्या करारासाठी सोन्याचा दर ०.१५ टक्क्यांनी घसरून १,५९,३६८ रुपये झाला आहे. तर चांदीच्या किंमतीतही ०.३१ टक्क्यांची घसरण झाली असून चांदी २,७४,०३६ रुपये प्रति किलोवर आली आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता या देशातील प्रमुख शहरांमध्ये स्थानिक कर आणि मागणीनुसार सोन्या-चांदीच्या दरात काही अंशी तफावत दिसून येत आहे.