सराफा बाजारात मोठा उलटफेर, 10 ग्रॅम सोन्याची किंमत काय ?
सराफा बाजारात मोठा उलटफेर, 10 ग्रॅम सोन्याची किंमत काय ?
img
Nandini khandare More

 अमेरिका आणि इराणमध्ये असलेला तणावाच्या पार्श्वभूमीवर   गेल्या अनेक दिवसांपासून सोने चांदीच्या दरात चढ उतार होताना दिसत आहेत. दरम्यान आज पुन्हा एकदा सराफ बाजारात उलटफेर झाली असून सिन्याची चकाकी आता कमी झाल्याचे दिसतेय. एका दिवसाच्या स्थिरतेनंतर, 2 जून रोजी सलग दुसऱ्या दिवशी सोन्याची चमक फिकी पडली.

या दोन दिवसांत, 24-कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 810 रुपयांनी तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 760 रुपयांनी घसरला.यापूर्वी, 31 मे रोजी त्याचा भाव स्थिर राहिला होता. आज, राजधानी दिल्लीत दहा ग्रॅम 24-कॅरेट सोन्याचा भाव 10 रुपयांनी घसरला आणि 22-कॅरेट सोन्याचा भावही 10 रुपयांनी कमी झाला. आता, सलग तीन दिवस स्थिर राहिल्यानंतर आज दिल्लीत चांदी स्वस्त झाली आहे. आज तिचा भाव प्रति किलो 100 रुपयांनी घसरला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group