सोन्याच्या दरात ३ दिवसांत मोठी घसरण ! वाचा आजचे दर काय ?
सोन्याच्या दरात ३ दिवसांत मोठी घसरण ! वाचा आजचे दर काय ?
img
Nandini khandare More
सोन्याच्या दरात सतत चढ उतार होत असून आता पुन्हा एकदा  सलग तीन दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळतेय. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे.  आज दिनांक २९ ऑगस्ट रोजी सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर घसरले असल्याचे पाहायला मिळाले. २४ कॅरेट १ तोळं किमतींत २,८९० रुपयांनी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र चांदीच्या किंमतीत कोणताही बदल पाहायला मिळालेला नाही.

Goodreturn नुसार, सण-वारांच्या कालावधीत सोन्याचे दर घसरताना दिसत आहेत. याचा सर्वसामान्यांना नक्कीच फायदा होणार आहे. कारण आज २४ कॅरेट १ तोळं सोन्याच्या किंमतीत २८९० रुपयांनी घसरण झाली. तर २२ कॅरेट १ तोळ्याच्या किंमतीत २६५० रुपये आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरात २१७० रुपयांनी घसरण झालेली आहे. पुढे आपण मुंबई-पुण्यासह इतर शहरातले दर जाणून घेणार आहोत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group