महत्वाची बातमी :   सोन्याच्या दरात मोठी घसरण !  जाणून घ्या आजचे नवे दर
महत्वाची बातमी : सोन्याच्या दरात मोठी घसरण ! जाणून घ्या आजचे नवे दर
img
दैनिक भ्रमर



सोने खरेदी करण्याचा विचार करत असणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे .  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोन्याची खरेदी 1 वर्षासाठी करू नका, असे आवाहन नागरिकांना केले. नरेंद्र मोदी यांनी सोने खरेदी न करण्याचे आवाहन करताच त्याचे पडसाद सराफा व्यापारात बघायला मिळाले. हेच नाही तर सोन्याच्या दरात घसरण देखील झाली. सोन्यासोबतच चांदीचेही भाव घसरले आहेत. परकिय चलन वाचवण्याकरिता हे आवाहन करण्यात आले. इराण आणि अमेरिका युद्धात जग संकटात असतानाही भारतात सोन्याची मोठी खरेदी होत आहे. त्याचा परिणाम परकिय चलनावर होत आहे. आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली.

सोन्याच्या दरात 800 रुपयांची तर चांदीच्या दरात 1 हजार रुपयांची घसरण नोंदवण्यात आली. सोन्याचा 24 कॅरेटचा दर जीएसटीसह 1 लाख 54 हजार 500 रुपये आहे तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 66 हजार 770 रुपयांवर आहे. कालच्या तुलनेत सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली. भारत हे सोन्याची अत्यंत मोठी बाजारपेठ आहे. भारतात विदेशातून सोने आयात केले जाते. दरम्यान , युद्धादरम्यान सोन्याचे दर घसरत आहेत. मात्र, यादरम्यानच भारतात सोन्याची मागणी चांगलीच वाढल्याचे बघायला मिळत आहे. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group