सोन्याच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे नवीन सोने-चांदीचे भाव
सोन्याच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे नवीन सोने-चांदीचे भाव
img
Nandini khandare More




गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात मोठे चढ उतार होताना दिसत आहेत. दरम्यान आज मात्र सोने खरेदी कारण्याऱ्यांसाठी चांगली संधी आहे.नुकताच आजचे सोन्याचे भाव पुढे आले असून  14 मे 2026 रोजी सोन्याच्या भावात घसरण झाल्याचे वृत्त आहे.  

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला मोठे आवाहन करत पुढील 1 वर्ष सोने न खरेदी करण्यास सांगितले. या आवाहनानंतर सोन्याच्या किमती घसरल्या. त्यानंतर थेट केंद्र सरकारने आदेश काढत मोठा दणका दिला. सोन्याचे 6 टक्के आयात शुक्ल वाढून थेट 15 टक्के केले, ज्याने एकच खळबळ उडाली. सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली. दोन दिवस सोन्याच्या किमती वाढताना दिसल्या. आता नुकताच आजचे सोन्याचे भाव पुढे आलीत. 14 मे 2026 रोजी सोन्याच्या भावात घसरण झाली.  एमसीएक्सवर सोन्याचा भाव 301 रुपयांनी घसरला. चांदीच्या भावातही घसरण झाली.

मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम ₹1,62,10 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,48,510 आहे. दिल्ली येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅम 1,62,160 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅम ₹1,48,660 आहे. चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम ₹1,63,680 आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,50,10 आहे. पुणे आणि बंगळूरुमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,62,10 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,48,510 आहे.

14 मे रोजी सकाळी चांदीचा भाव प्रति किलोग्राम ₹3,10,100 पर्यंत गेला. सोन्याच्या भावावरील आयात कर वाढवल्याने सोन्याच्या भावात वाढ झाली. मात्र, कालच्या तुलनेत आज सोने स्वस्त झाले. इराण आणि अमेरिका युद्धाचा सर्वात जास्त सोन्यावर परिणाम झाला. सोन्याचे भाव या युद्धापूर्वी दोन लाखाच्या आसपास पोहोचले होते. आता त्यांच्यात घसरण झाली. पुन्हा आता सरकारने मोठा निर्णय घेतला.



इतर बातम्या
Join Whatsapp Group