अधिकमास सुरु होताच सराफ बाजारात मोठी उलाढाल ; आजचे सोने चांदीचे दर काय ?
अधिकमास सुरु होताच सराफ बाजारात मोठी उलाढाल ; आजचे सोने चांदीचे दर काय ?
img
Nandini khandare More




देशभरात मोठ्या घडामोडींना वेग आला असून गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे आणि चांदीचे भाव वर चढलेले होते, मध्येच त्यात घसरण झाली तरी खूप फरक पडत नव्हता. दरम्यान, आता पुन्हा एकदा सोने चांदीच्या भावात मोठी उलाढाल झाली असल्याची अपडेट आहे. 

कालपासून अधिकमासाला सुरूवात झाली असून यानिमित्ताने सोनं-चांदीच दागिने, वस्तू, आभूषणं यांच्या खेरदीला मोठा वेग येतो. मात्र सध्य़ाचे दर पाहता या वस्तू कशा विकत घेता येणार असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकांना पडला होता.

मात्र आता एक  मोठी अपडेट समोर आली आहे. सोमवार, 18 मे रोजी देशात सोन्याच्या किमतीत घट झाल्याचे दिसून आले. 18 मे रोजी सकाळी देशातील बहुतांश शहरात सोन्याचे दर खाली घसरलेले दिसून आले. त्यामुळे अधिकमासाचनिमित्त खरेदी करण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

18 मे च्या सकाळी राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत खाली घसरून 1,57,070 रुपये इतकी झाली आहे. गेल्या आठवड्यात 24 कॅरेट सोन्याच्या दरात 6540 रुपये तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 6470 रुपयांपर्यत वाढ नोंदवण्यात आली होती.


 प्रमुख शहरातील सोन्याचे दर

> दिल्लीत सोन्याची किंमत : दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,57,070 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे. 22 कॅरेट चा भाव 1,43,990 रुपये प्रति 10 ग्रॅम असा आहे.

 > मुंबई आणि कोलकाता : मुंबई आणि कोलकाता या दोन शहरात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोनं हे 1,43,850 रुपयांना तर 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं हे 1,56,920 रुपयांना मिळत आहे.

> चेन्नई मध्ये सोन्याचे दर : 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,60,910 रुपये असून तर 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,47,500 रुपये इतका आहे.

> पुणे आणि बंगळुरू : या दोन शहरांमध्ये 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्यासाठी 1,56,920 रुपये मोजावे लागत असून 22 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचे दर हे 1,43,840 रुपये इतके आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group