युद्ध थांबलं अन क्षणात सोन्याचे भाव वाढले; बाजारात मोठी उलथापालथ
युद्ध थांबलं अन क्षणात सोन्याचे भाव वाढले; बाजारात मोठी उलथापालथ
img
वैष्णवी सांगळे
मिडल ईस्टमधील तणाव कमी होण्याच्या संकेतांनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा जोरदार वाढ झाली आहे. इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संभाव्य शस्त्रसंधीच्या बातम्यांमुळे गुंतवणूकदारांचा कल सुरक्षित पर्यायाकडे वळला आणि सोन्याच्या दरात तब्बल १.६ टक्क्यांची वाढ झाली.

गेल्या काही दिवसांपासून प्रचंड धास्तावलेल्या भांडवली बाजाराने देखील सुटकेचा निश्वास टाकला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी होताच भारतीय शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. याशिवाय, भारतीय गुंतवणुकदारांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला सोने आणि चांदीच्या दरातही मोठी वाढ होताना दिसत आहे. 

अमेरिका – इराण मध्ये सीझफायर घोषित होताच सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.  सोन्याच्या दरात 3 हजार रूपयांनी तर चांदीचा दरातही 10 हजार रुपयांची वाढ झाली आहे.  बुधवारी सकाळी वायदे बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या भावात मोठे बदल पाहायला मिळाले. मंगळवारी जीएसटी वगळता सोन्याचा भाव 1,47,500 रुपये इतका होता. तो बुधवारी तीन हजार रुपयांनी वाढून 1 लाख 51 हजार 500 रुपयांवर पोहोचला. 

तर चांदीच्या दरात किलोपाठी 10 हजार रुपयांची वाढ पाहायला मिळाली. काल एक किलो चांदाजी भाव 2 लाख 37 हजार इतका होता. तो बुधवारी सकाळी थेट 2 लाख 47 हजारांवर जाऊन पोहोचला आहे. इराण-अमेरिका युद्ध आता समाप्तीच्या दिशेने वाटचाल करु लागल्याने आगामी काळात सोन्याच्या भावात आणखी उसळी पाहायला मिळू शकते, असा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांकडून वर्तवला जात आहे. 

तज्ञांच्या मते, ही वाढ म्हणजे एकाप्रकारने “सुटकेची प्रतिक्रिया” आहे. जर इराणने कराराच्या अटींचे पालन केले नाही, तर बाजारात पुन्हा अनिश्चितता येऊ शकते. ऊर्जा किमतींमधील चढ-उतारामुळे महागाईचा धोका निर्माण होतो. बॅरन्सच्या एका अहवालानुसार, जर तेलाच्या पुरवठ्यावर दीर्घकाळ परिणाम झाला, तर अमेरिकेतील महागाई 4 टक्क्यांपेक्षा जास्त वाढू शकते.

या वर्षाच्या सुरुवातीला सोनं प्रचंड तेजीत होतं, सोन्याचे दर 2 लाखांच्या पार केले होते, मात्र 28 फेब्रुवारी इराण -अमेरिका युद्ध सुरू झाल्यानंतर सोनं 8 टक्क्यांहून अधिक घसरले. आता, सोन्यात आलेली ही तेजी टिकेल की केवळ एक तात्पुरता दिलासा ठरेल, याकडे बाजाराचे लक्ष लागले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group