गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात चढ-उतार होत असल्याचे पहायला मिळत आहे. सोनं-चांदीच्या दरावर आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींचा परिणाम होत. मात्र आज सोन्याच्या दरात मोठी घडामोड झाली. सोन्याचा दर एमसीएक्सवर (MCX) प्रति तोळा दीड लाखापेक्षा खाली घसरला आहे. मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १.५० लाख रुपयांच्या खाली घसरला आहे. सोन्यात दबाव असला तरी चांदीने मात्र आपली पकड घट्ट ठेवली आहे.
१ सोनं घसरलं
बुधवारी, सोन्याच्या भावात झालेली घसरण फार मोठी नसली, तरी १.५० लाखांचा महत्त्वाचा स्तर सोन्याने तोडला आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरात थोडी सुधारणा पाहायला मिळाली. सध्या चांदीचा भाव सुमारे २.४३ लाख रुपये प्रति किलोच्या आसपास आहे. म्हणजेच, जिथे सोन्यावर दबाव आहे, तिथे चांदी सध्या सावरलेली दिसत आहे. जागतिक स्तरावरील काही महत्त्वाच्या घडामोडींचा परिणाम सोन्याच्या किमतीवर होत असल्याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले.
अमेरिकन डॉलर वधारल्यामुळे सोन्यातील गुंतवणूक कमी आकर्षक ठरत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्याकडे पाठ फिरवत आहेत. पश्चिम आशियातील तणावामुळे तेलाच्या किमती वाढल्या आहेत, ज्याचा परिणाम गुंतवणूकदारांच्या स्ट्रॅटेजीवर झाला आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह आणि बँक ऑफ इंग्लंड व्याजदरांबाबत लवकरच मोठे निर्णय घेणार आहेत, त्यामुळे गुंतवणूकदार सध्या सावध पवित्रा घेत आहेत. तज्ज्ञांच्या मते, जोपर्यंत जागतिक अनिश्चितता आणि इराणशी संबंधित वाद शमत नाहीत, तोपर्यंत सोन्यावर दबाव राहू शकतो. जर ही परिस्थिती कायम राहिली, तर सोन्याच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरेदी करताना घाई न करता जागतिक घडामोडींवर लक्ष ठेवणे फायद्याचे ठरेल.