सध्या सोने, चांदीच्या भावात सतत चढ उतार होत आहेत. आजचे सोन्या-चांदीचे दर काय आहेत जाणून घ्या. सोन्याच्या दरात आजच्या घडीला कोणते ही बदल झालेले नाही. मात्र चांदिचे दर आज घसरले आहेत.
सध्या लग्नसराई सुरू असल्याने सोन्या-चांदीच्या दागिने खरेदीसाठी सराफांच्या दूकानात आपल्याला गर्दि पाहायला मिळते. परंतू सोन्याच्या भावात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सोन्याचे दर जवळपास दिड लाखांपर्यंत पोचला आहे. त्यामुळे सोनं खरेदी करावं की नाही असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
दरम्यान,सध्या सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या अनेक दिवसापासून सोन्याच्या दरात सतत बदल होत होते. आता चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे.
सोन्याचे दर स्थिर
गेल्या अनेक दिवसापासून सोन्याच्या दरात बदल पाहायला मिळाले मात्र आज सोन्याच्या दरात कोणता ही बदल झालेला नाही. काय आहेत आजचे सोन्याचे भाव जानून घ्या.
आजचे सोन्याचे दर
आज 24 कॅरेट सोन्याचे दर प्रती तोळा 1,55,290 एवढे आहे. तर 8 ग्रॅमचे दर 1,24,232 रूपये आहे. 10 तोळ्याचे दर15,52,900 रूपये एवढे आहेत.
22 कॅरेट सोन्याचे दर प्रती तोळ्यामागे1,41,350 रूपये एवढे झाले आहे. 8 ग्रॅमचे दर 1,13880 एवढे झाले आहे. 10 तोळ्यामागे सोन्याचे दर 14,23,500 रूपये आहे.
चांदीच्या दरात घसरण
आजच्या सोन्याच्या दरता घसरण झाली नसली तरी चांदीचे दर मात्र घसरले आहेत. चांदीच्या दरात 1 किलोमागे तब्बल 10,000 रूपयांची घसरण झाली आहे. १० ग्रॅमागे चांदी 100 रूपयांनी स्वस्त झाली आसून 2,650 रूपये झाले आहेत. 100 ग्रॅमागे 1000 रूपयांची घसरण झाली असून 26,500 एवढे झाले आहेत.