महागाईची झळ सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात सोसावी लागत आहे. सोन्याचे भाव पुन्हा वाढल्याने सोनं खरेदीसाठी आता जादा दाम मोजावे लागणार आहे. काही दिवसांपूर्वी सोन्याचे दर १ लाखांच्या पार गेले होते. दरम्यान, हे दर आठवड्याभरात १ लाखांपेक्षा कमी झाले होते. परंतु आज पुन्हा सोन्याचे दर १ लाखांपेक्षा जास्त झाले आहेत. आज सोन्याच्या दरात प्रति तोळा ११० रुपयांनी वाढ झाली आहे. तर १० तोळ्यांच्या दरात ११०० रुपयांनी वाढ झाली आहे.
२४ कॅरेट सोन्याचे दर
आज १ तोळा सोन्याचे दर १,००,१५० रुपये आहेत. या दरात ११० रुपयांनी वाढ झाली आहे. १० तोळा सोन्याचे दर १०,०१,५०० रुपये आहेत. या दरात १,१०० रुपयांनी वाढ झाली आहे.
२२ कॅरेट सोन्याचे दर
आज १ तोळा सोन्याचे दर ९१,८०० रुपये आहेत. या दरात १०० रुपयांनी वाढ झाली आहे. १० तोळा सोन्याचे दर ९,१८,००० रुपये आहेत. या दरात १००० रुपयांनी वाढ झाली आहे.
१८ कॅरेट सोन्याचे दर
आज १८ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा ८० रुपयांनी वाढ झाली आहे. १ तोळा सोन्याचे दर ७५,११० रुपये आहेत. १० तोळा सोन्याचे दर ७,५१,१०० रुपये आहेत. या दरात ८०० रुपयांनी वाढ झाली आहे.