लग्नसराईच्या या हंगामात मौल्यवान धातू सोन्यात सध्या चढउताराचे सत्र दिसून येत आहे. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्यात घसरण दिसून आली. सोने-चांदीच्या चढउताराचा ग्राहकांच्या खिशांवर चांगलाच परिणाम होतोय.
गेल्या आठवड्यात सोन्यामध्ये 1 हजारांची दरवाढ नोंदवली गेली. या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सोन्याच्या किमतीमध्ये 650 रुपयांची घसरण झाली. त्यात 22 आणि 24 कॅरेटच्या सोन्याचा भाव खाली उतरल्याचे दिसून आले. तर काल 2 डिसेंबर रोजी पुन्हा 650 रुपयांनी सोने वधारले. आज सकाळच्या सत्रात सोन्यात घसरणीचे संकेत मिळाले आहेत.
गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,005 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77, 500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. या पंधरा दिवसांत चांदीने देखील मोठी आघाडी घेतली आहे. गेल्या आठवड्यात चांदीमध्ये 2500 रुपयांची घसरण दिसून आली. तर या आठवड्याच्या अखेरीस त्यात 2 हजारांची दरवाढ दिसून आली. गुडरिटर्न्सनुसार एक किलो चांदीचा भाव हा 91 हजार रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार
24 कॅरेट सोने 76, 308 रुपयांवर आहे.
23 कॅरेट सोने 76,002 रुपयांवर आहे.
22 कॅरेट सोने 69,898 रुपयांवर आहे.
18 कॅरेट सोने 57,231 रुपयांवर आहे.
14 कॅरेट सोने 44,640 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे.
दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.