गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आता दोनच दिवसांवर येऊन उभा आहे. त्याआधी सोन्याच्या दरांनी महागाईची गुढी उभारली आहे, ज्यामुळे मराठी नवीन वर्षाआधीच ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे.
आठवड्याच्या सुरुवातीला सोने-चांदीचे भाव घसरले होते. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करु असा अनेकांचा मानस होता. पण अचानक सोने चांदीच्या दरात भाववाढ झाली आहे. त्यामुळे सणावाराला खरेदी करण्याची तयारी दाखवणाऱ्या ग्राहकांचा हिरमोड झाला आहे.
जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरात १,५०० रुपयांनी वाढ झाली आहे. मागील दोन दिवसांपूर्वी जळगावमध्ये सोन्याचे दर ८८ हजार रुपये इतके होते. आज अचानक या दरात पंधराशे रुपयांनी वाढ झाली.
सोन्याचा आजचा दर ८९ हजार ३०० रुपयांवर पोहोचला आहे. हाच दर जीएसटीसह ९२ हजार रुपयांपर्यंत गेला आहे.
२ एप्रिल रोजी ट्रारिफ रेट लागू होणार आहेत. त्यामुळे सोन्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे अशी माहिती सुवर्ण व्यवसायिकांनी दिली आहे. ३० मार्च रोजी गुढीपाडवा आहे. या निमित्ताने अनेकजण सोन्याची खरेदी करतात. पण सोन्याच्या दरांमध्ये वाढ झाल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे सोने-चांदीच्या दुकानांमधील गर्दी कमी झाल्याचे म्हटले जात आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,355 रुपयांना मिळेल.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 66,840 मिळेल.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 83,550 एवढा आहे.
१०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,35,500 रुपये इतका असल्याची माहिती आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 9,11,300 रुपये किंमतीने विकतंय.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 91,130 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोनं आज 72,904 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 9,113 रुपयांनी विकलं जात आहे.