गेल्या २ दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ होताना दिसतेय. सोन्याच्या वाढलेल्या भावामुळे ग्राहक आधीच चिंतेत आहेत. अशातच ग्राहकांच्या चिंतेत अजून भर घालणारी बातमी आहे. आज देखील सोन्याचे भाव वाढले आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचे भाव वाढले होते. मात्र या घसरणीला ब्रेक मिळून आता सोन्याच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे.
Good returns वेबसाईटनुसार, शुक्रवारी म्हणजेच आज १८ एप्रिल रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 270 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 9,77,300 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,960 रुपयांना मिळेल.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 71,680 मिळेल.
० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 89,600 एवढा आहे.
तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,96,000 रुपये इतका असल्याची माहिती आहे
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 9,77,300 रुपये किंमतीने विकतंय.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 97,730 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोनं आज 78,184 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 9,773 रुपयांनी विकलं जात आहे.
नाशिक
22 कॅरेट सोनं - 8,948 रुपये
24 कॅरेट सोनं - 9,761 रुपये