आज २६ जानेवारी २०२६… देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन. आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर वाढले आहेत. आज सोनं प्रति तोळ्यामागे जवळपास अडीच हजार रुपयांनी वाढले आहे.
आज सोन्याचे दर किती जाणून घ्या
२४ कॅरेटचे दर - आज २४ कॅरेट सोन्याचे दर २,४५० रुपयांनी वाढले असून १,६२,७१० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोनं १९६० रुपयांनी महागलं असून १,३०,१६८ रुपये झाले आहे. १० तोळ्यामागे सोन्याचे दर २४,५०० रुपयांनी वाढले असून १६,२७,१०० रुपये झाले आहेत.
२२ कॅरेटचे दर - आज २२ कॅरेट सोन्याचे दर २,२५० रुपयांनी वाढले असून १,४९,१५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोनं १,८०० रुपयांनी महागलं असून १,१९,३२० रुपये झाले आहे. १० तोळ्यामागे सोन्याचे दर २२,५०० रुपयांनी वाढले असन १४,९१,५०० रुपये झाले आहे.
१८ कॅरेटचे दर - आज १८ कॅरेट सोन्याचे दर १,८४० रुपयांनी वाढले असून १,२२,०३० रुपये आहेत. ८ ग्रॅममागे सोनं १,४७२ रुपयांनी महागलं असून ९७,६२४ रुपये झालं आहे. १० तोळ्यामागे सोन्याच दर १८,४०० रुपयांनी वाढले असून १२,२०,३०० रुपये झाले आहेत.
चांदीचे दर
आज चांदीच्या दरातदेखील वाढ झाली आहे. १ किलोमागे चांदीचे दर ५००० रुपयांनी वाढले आहे. हे दर ३,४०,००० रुपये झाले आहे. चांदीचे दरदेखील मागच्या आठवड्यापासून सतत वाढताना दिसत आहे. १० ग्रॅममागे चांदीचे दर ५० रुपयांनी वाढले असून ३,४०० रुपये झाले आहेत.