जळगावमध्ये इतिहासात पहिल्यांदाच सोन्याचा दर उच्चांकी पातळीवर गेला आहे. जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोन्याचा दर ९३ हजार रुपयांवर पोहचला आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर २० ते २५ कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.
आजही सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. एकाच दिवसात सोने पुन्हा 800 रूपयांनी महाग झाले आहे.जळगावच्या सुवर्णनगरीत गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ होऊन इतिहासात पहिल्यांदाच सोन्याचा दर जळगावच्या सुवर्णनगरीत ९३ हजार रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीचा दर १ लाख ५ हजारांवर पोहचला आहे.
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोन्याला दीडपटीने मागणी राहिली. या मुहूर्तावर एकूण १७५ फर्ममध्ये २० ते २५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात चढ-उतार होत आहे. मात्र दोन्हीही मौल्यवान धातूंचे भाव मोठ्या प्रमाणात वाढून सोने ९३ हजारांवर तर चांदी १ लाख ५ हजारांवर गेली आहे.