दिवाळीत सोने आणि चांदीने गरूड भरारी घेतली आहे. सोने 1200 रुपयांनी तर चांदी किलोमागे दोन हजारांनी महागली. या आठवड्याच्या सुरुवातीला मौल्यवान धातुत घसरण झाली होती. पडझडीच्या सत्रानंतर मौल्यवान धातुच्या किंमतींनी अचानक उसळी घेतली.
नरक चतुर्दशीच्या दिवशी पण भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तरीही बाजारात ग्राहकांची भाऊगर्दी होत आहे. आता या बेशकिंमती धातुच्या अशा आहेत किंमती
गेल्या आठवड्यात सोने 1400 रुपयांनी वधारले. तर या आठवड्याच्या सुरुवातीला भाव 490 रुपयांनी स्वस्त झाले. 29 ऑक्टोबरला आणि 30 ऑक्टोबर रोजी सोन्याने अनुक्रमे 600 आणि 700 रुपयांची भरारी घेतली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 74,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 81,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीत 2 हजारांची उसळी
29 सप्टेंबरनंतर जवळपास 20 दिवस चांदीत मोठी उलाढाल दिसली नाही. पण त्यानंतर चांदीचा वारु उधळला. गेल्या आठवड्यात चांदी 3 हजार रुपयांनी उसळली तर त्यात 6,000 रुपयांची घसरण झाली. तर या 29 आणि 30 ऑक्टोबर रोजी प्रत्येकी 1 हजारांची दरवाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,00,000 रुपये झाला आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार 24 कॅरेट सोने 79,581, 23 कॅरेट 79,262, 22 कॅरेट सोने 72,896 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 59,686रुपये, 14 कॅरेट सोने 46,555 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे.
एक किलो चांदीचा भाव 98,040 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.