१ फेब्रवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प जाहीर केला. अर्थसंकल्प सादर होताच सोन्याच्या किमतीत कमालीची वाढ झाली होती. पण आठवड्याच्या पहिल्या दिवशीच सोन्याच्या किमती घसरल्या. आता अर्थसंकल्पानंतर सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
४ फेब्रुवारी म्हणजे आज सोनं स्वस्त झाले आहे. आज २४ आणि २२ कॅरेट सोन्याच्या किमतीत ४०० रुपयांनी घट झाली आहे. १० ग्रॅम सोन्याची सरासरी किंमत ८४,१०० रुपयांच्या आसपास गेली आहे.
मोदी सरकारने अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क वाढवले नव्हते. यामुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला. कुठेतरी सर्वसामान्य ग्राहकांनाही याचा फायदा झाला आहे. सोन्याचा भाव आता कमी होऊ लागला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
आज चांदीच्या किमतीत देखील थोडीशी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. चांदीच्या दरात १०० रुपयांची घसरण झाली. चांदीची किंमत प्रतिकिलो ९९,३०० रुपयांवर आली आहे. याआधी चांदीचा भाव ९९,४०० रुपये होता. त्यामुळे सोन्यापाठोपाठ चांदीच्या किमतीमध्ये देखील काहिशी घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदार आणि खरेदी करणाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.