कॅन्सर रुग्णांना मोठा दिलासा! 3 औषधं होणार स्वस्त ; यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी काय जाणून घ्या
कॅन्सर रुग्णांना मोठा दिलासा! 3 औषधं होणार स्वस्त ; यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी काय जाणून घ्या
img
Dipali Ghadwaje
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये कॅन्सरच्या रुग्णांना मोठा दिलासा दिला. कॅन्सरच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या आणखी तीन औषधांवर सीमाशुल्कात सूट देण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले. सरकारच्या या निर्णयामुळे कॅन्सरवरील औषधं स्वस्त होणार आहे. याचा फायदा देशातील लाखो कॅन्सर रुग्णांना होण्याची शक्यता आहे.

कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढण्यासाठी सरकार कटिबद्ध असून या दिशेने सातत्याने काम करत असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. कॅन्सरवरील ३ औषधांवर सीमाशुल्कात सूट दिल्याने कॅन्सरच्या उपचारावरील आर्थिक भार कमी होईल. याआधीही सरकारने कॅन्सरच्या औषधांवर सीमा शुल्कात सूट दिली होती. आता या यादीत आणखी तीन औषधांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे कॅन्सर रुग्णांना दिलासा मिळाला आहे. 

देशात स्वस्त दरात औषधे उपलब्ध व्हावी आणि लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचे अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितले. सरकारच्या या पाऊलामुळे कॅन्सरच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. 

मागील अर्थसंकल्पातही सरकारने आरोग्य क्षेत्राकडे विशेष लक्ष देऊन अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या होत्या. या अर्थसंकल्पात उचललेल्या पावलांमुळे देशाच्या आरोग्य क्षेत्रात आणखी सुधारणा होईल अशी आशा आहे.

आरोग्यमंत्र्यांनी देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी वैद्यकीय एक्स-रे मशीनमध्ये वापरल्या जाणाऱ्या एक्स-रे ट्यूब आणि फ्लॅट पॅनेल डिटेक्टरवरील मूलभूत सीमाशुल्क कमी करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे मशिन्सच्या किमती कमी होण्यास मदत होईल आणि रुग्णांसाठी आरोग्यसेवा स्वस्त होण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group