अरे बापरे ! झोपेत असतानाच नाकात घुसले झुरळ , पुढे काय घडले? वाच
अरे बापरे ! झोपेत असतानाच नाकात घुसले झुरळ , पुढे काय घडले? वाच
img
Dipali Ghadwaje
आपले घर स्वच्छ-नीटनेटके दिसणे कोणाला आवडत नाही? घराच्या स्वच्छतेमुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार तर वाढतोच, शिवाय घरात आजारही कमी पसरतात. मात्र घर किती स्वच्छ ठेवले, तरी कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात झुरळं असतातच. हेच झुरळं कधी तुमची झोप उडवेल सांगता येत नाही. कारण अशीच एक घटना समोर आली आहे. झोपेत असलेल्या एका व्यक्तीच्या नाकात झुरळ शिरले. नाकावाटे शरीराच्या अशा भागात गेले की, त्याला शोधण्यासाठी डॉक्टरांना तीन दिवस लागले.

चीनमधील हेनान प्रांतातील एका ५८ वर्षीय व्यक्तीसोबत ही घटना घडली आहे. होइकोउ नावाच्या व्यक्ती झोपेत असताना झुरळ नाकावाटे आत गेले. त्यामुळे त्यांना खूपच त्रास सहन करावा लागला. डॉक्टरांनी तपासण्या केल्यानंतर झुरळ सापडले.

नाकातून शरीरात झुरळ कसे गेले? 

होइहोउ हे झोपलेले होते. त्यावेळी त्यांच्या नाकात झुरळे गेले. जोरात श्वास आत घेतल्याने झुरळ आणखी आत केले. सकाळी उठल्यानंतर त्यांना नाकात कीडा वळवळ करत असल्याचे जाणवले. काही वेळाने कीडा घशातून शरीरात जात असल्याचे त्यांना जाणवले. या सगळ्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. एक दिवस गेल्यानंतर त्यांच्या श्वासातून घाण वास येउ लागला. त्यामुळे होइहोउ यांनी डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला, कारण तीन दिवसांपासून त्यांच्या श्वासावाटे खूप घाण वास येऊ लागला होता. जेव्हा ते कान, नाक, घसा तज्ज्ञाकडे गेले, त्यावेळी डॉक्टरला श्वसनात काहीही अडचण नसल्याचे आढळून आले.

शरीरात गेलेले झुरळ डॉक्टरांनी कसे शोधले? 

होइहोउ यांना बरे वाटत नव्हते. त्यामुळे ते डॉ. लिन लिग यांच्याकडे गेले. त्यांनी छातीचा सीटीस्कॅन केला. त्यात छातीच्या डाव्या बाजूला खाली काहीतरी असल्याचे दिसले. ब्रोंकोस्कोपीने ती गोष्ट बाहेर काढणे शक्य होते. ऑपरेशन करताना छातीच्या खालच्या बाजूला अडकलेला, ती गोष्ट पंख असलेला कीडा असल्याचे डॉक्टरांना दिसले. कफ काढल्यानंतर ते झुरळ असल्याचे स्पष्ट झाले. ऑपरेशननंतर होइहोउ यांच्या श्वासावाटे येणारा दुर्गंधही गेला आणि त्यानंतर स्वस्थ वाटू लागले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group