जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, मंकीपॉक्स हा देखील कोविड सारख्या विषाणूप्रमाणे पसरणारा आजार आहे. हा आजार देखील संसर्गजन्य आहे. यामुळे वेदनादायक पुरळ, लिम्फ नोड्स वाढणे आणि ताप येऊ शकतो. हा आजार कोविडसारखा संसर्गजन्य आणि प्राणघातक नाही. मंकीपॉक्स एक झुनोसिस आजार आहे. याचा अर्थ असा की, हा एक असा आजार आहे, जो प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरतो.
खार, गॅम्बियन शिकार करणारे उंदीर, डॉर्मिस, माकडांच्या विविध प्रजाती आणि इतरांसह प्राण्यांमध्ये मंकीपॉक्स व्हायरसच्या संसर्गाचे पुरावे सापडले आहेत. त्यामुळे आता या आजाराबाबत भिती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मंकीपॉक्सची लक्षणे काय आहेत, ते जाणून घेऊयात.
मंकीपॉक्स हा अतिशय दुर्मिळ आजार आहे. संसर्ग झालेल्या रुग्णाशी जवळचा संबंध आल्यास हा रोग वेगाने पसरतो. मंकीपॉक्स हा डीएनए व्हायरस आहे. या व्हायरसचा संसर्ग हवेतून होत नाही. मात्र, रुग्ण संपर्कात आल्यास संसर्गाची भीती असते.
मंकीपॉक्सची लक्षणे काय आहेत?
संक्रमित व्यक्तीला हलका ताप जाणवेल. यामुळे शरीरावर वेदनादायक पुरळ, डोकेदुखी, स्नायू आणि पाठदुखी, अशक्तपणा जाणवणे, आणि वाढलेले लिम्फ नोड्स आणि शरीरावर पू भरलेले फोड यांसह फ्लू सारखी लक्षणे उद्भवतात. ही लक्षणे 2 ते 4 आठवडे टिकू शकतात. रुग्ण बरा झाल्यानंतरही शरीरावर डाग तसेच राहतात.
मंकीपॉक्स झाल्यास काळजी कशी घ्यावी?
- लक्षणांच्या तीव्रतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी, ती कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार देण्यात यावा.
- दुय्यम बॅक्टेरिअल संसर्ग असल्यास त्यावर योग्य ते उपचार करण्यात यावेत
- पुरेशा प्रमाणात द्रव्ये द्यावीत, जेणेकरून शरीरात पाण्याची कमतरता होणार नाही.
- पोषक आहार देण्यात यावा.
मंकीपॉक्स विषाणू कुठून आला?
मंकीपॉक्स विषाणू 1958 मध्ये सापडला. संशोधनासाठी ठेवलेल्या माकडांमध्ये कांजिण्यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने या विषाणू आढळून आला. मूळतः "मंकीपॉक्स" असे नाव असूनही, रोगाचा स्त्रोत हे अद्यापही माहित नाही. 1970 मध्ये एमपॉक्सचा पहिला मानवी संसर्ग नोंदवला गेला. 2022 मध्ये याचा रुग्ण प्रथम काँगोमध्ये आढळून आला.
मंकीपॉक्स किती घातक आहे?
मंकीपॉक्सचे दोन प्रकार आहेत. क्लेड I स्ट्रेनमुळे अधिक गंभीर आजार. या स्ट्रेनच्या संसर्गाच्या बाबतीत, मृत्यूचे प्रमाण 10 टक्क्यांपर्यंत दिसून आले आहे. दुसरा स्ट्रेन क्लेड II आहे. तोही सांसर्गिक आहे. त्याच्या संसर्गामुळे अधिक लोक आजारी पडतात, परंतु संसर्ग झालेल्या 99.9% पेक्षा जास्त लोक मरत नाहीत.
या आजाराचा धोका कोणाला जास्त आहे?
ज्यांना आधीच कोणत्याही आजाराने ग्रासले आहे, एक वर्षापेक्षा कमी वयाची मुले, ज्यांना पूर्वी एखादा आजार झाला आहे, गर्भवती महिला आणि वृद्धांसाठी हा आजार धोकादायक ठरू शकतो.