तुर्कीनं भारत -पाकिस्तान वादात उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला, त्यानंतर आता भारताकडून तुर्कीच्या आर्थिक नाड्या आवळण्यात आल्या आहेत. भारतीय व्यापाऱ्यांकडून तुर्कीच्या मालावर बहिष्कार घालण्यात आला आहे. तुर्कीच्या सफरचंदावर भारतामध्ये बहिष्कार घालण्यात आला आहे, यामुळे तुर्कीला मोठा दणका बसला आहे. याचदरम्यान,आता तुर्कस्तानमधून एक मोठी बातमी समोर येत आहे.
तुर्कस्तान भूकंपाने हादरलं आहे. तुर्कस्तानमध्ये 5.2 रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. तुर्कीची जमीन पुन्हा एकदा हादरली आहे. तुर्कस्तान वारंवार भूंकपाने हादरत आहे. तुर्कस्थानमध्ये कधी सौम्य तर कधी प्रचंड तीव्रतेचे भूंकप यापूर्वी देखील आले आहेत. काही भूकंपांची तीव्रता एवढी प्रचंड होती की, त्यामुळे तुर्कस्तानचं जनजीवन विस्कळीत झालं.
दरम्यान, यापूर्वी 6 फेब्रुवारी 2023 ला देखील तुर्कस्थानामध्ये प्रचंड तीव्रतेचा भूकंप आला होता. 7.5 रिस्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप होता, या भूकंपामध्ये तुर्कस्थानासोबतच सिरीयाचं देखील मोठं नुकसान झालं होतं. हा तुर्कस्तानच्या इतिहासामधील सर्वात मोठा असा भूकंप होता, या भूकंपामध्ये पन्नास हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता, तसेच प्रचंड प्रमाणात वित्तहानी झाली होती. त्यापूर्वी 2020 मध्ये देखील तुर्कस्थानमध्ये मोठा भूकंप झाला होता.