अजित पवार गटाच्या ''या'' आमदाराच्या गाडीचा अपघात, ट्रकची समोरासमोर धडक
अजित पवार गटाच्या ''या'' आमदाराच्या गाडीचा अपघात, ट्रकची समोरासमोर धडक
img
DB
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघाचे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण लहामटे यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि आमदार किरण लहामटे  यांच्या कारची धडक झाली. या अपघातात सुदैवानं आमदार लहामटे यांना गंभीर दुखापत झालेली नाही. या अपघातात लहामटे यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले गेले.



अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील विटे घाटात आमदार किरण लहामटे यांच्या गाडीला अपघात झाला. अकोले येथून राजूरकडे जाताना त्यांच्या गाडीला ट्रकची समोरासमोर धडक बसली. दैव बलवत्तर म्हणून आमदार लहामटे या अपघातातून थोडक्यात बचावले. दरम्यान, अपघातात लहामटे यांच्या पायाला दुखापत झाली. प्राथमिक उपचारानंतर आमदार लहामटे राजूर येथील निवासस्थानी गेले.

इतर बातम्या
मोठी बातमी :

Join Whatsapp Group