अहो आश्चर्यम : महिलेच्या डाव्या गुडघ्याच्या सांध्यात हाडातील 69 तुकडे - खडे
अहो आश्चर्यम : महिलेच्या डाव्या गुडघ्याच्या सांध्यात हाडातील 69 तुकडे - खडे
img
दैनिक भ्रमर

नाशिक - मागील तीन चार वर्षापासून सतत गुडघे दुखीची तक्रार असणाऱ्या एका ५४ वर्षीय महिला रुग्णाच्या डाव्या गुडघ्याच्या सांध्यात हाडातील 69 तुकडे - खडे आढळून आले असल्याची आश्चर्यकारक आणि दुर्मिळ घटना नाशिक येथील रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. अजिंक्य देसले यांच्या निदर्शनास आली. ही घटना लिम्का बुकमध्ये नोंदविण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे.

नाशिक मधील ओ २ क्लिनिक आणि अपेक्स वेलनेस हॉस्पिटल नाशिक येथे सेवा देणाऱ्या डॉ .अजिंक्य देसले यांच्याकडे ही महिला एक ५४ वर्षांची महिला गुडघेदुखीची तक्रार घेऊन आली होती. तपासणीनंतर, त्यांना गुडघ्याच्या सांध्यातील ऑस्टियोआर्थरायटिसचे निदान झाले. त्यासाठी त्यांना गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.

शस्त्रक्रियेदरम्यान, मला या रुग्णाच्या डाव्या गुडघ्याच्या सांध्यातील 69 हाडातील तुकडे - खडे आढळून आले आणि ते काढले गेले. ही एक अनोखी घटना आहे आणि प्रथमच दस्तऐवजीकरण केलेली घटना आहे ज्यामध्ये एका शल्यचिकित्सकाने एकाच वेळी एकाच रुग्णाचे एवढ्या मोठ्या प्रमाणात हाडातील तुकडे - खडे काढले आहेत. 

 डॉ. अजिंक्य देसले म्हणाले की , ऑस्टियोआर्थरायटिस हा वयाशी संबंधित डिजनरेटिव्ह रोग आहे. म्हणजे वयानुसार सांध्यामध्ये होणारे घर्षण. जेव्हा असे होते तेव्हा, सांध्याची हाडे एकमेकांवर घासतात, परिणामी वेदना, सूज, सांधे हलविण्यात अडचण येते आणि चालणे, फिरणे दैनंदिन हालचाल करणे सुद्धा अशक्य होते. जेव्हा हे हाडांचे तुकडे हाडांपासून वेगळे होतात तेव्हा त्याचे हाडातील तुकडे - खडे बनतात.

शस्त्रक्रियेदरम्यान सहसा 2-3 असे तुकडे आढळतात. या रुग्णामध्ये, आम्ही गुडघा सांधेरोपण शस्त्रक्रियेदरम्यान असे 69 तुकडे आढळले आणि ते शस्त्रक्रिया करून काढले. 
संपूर्ण शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाची प्रकृती स्थिर होती. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आम्हाला कोणत्याही अतिरिक्त वेळेची आवश्यकता लागली नाही. ऑपेरेशन दरम्यान आणि नंतर देखील रुग्णाची प्रकृती स्थिर होती. ऑपेरेशन नंतर ५ व्याच दिवशी आपल्या पायावर  चालत रुग्णाला डिस्चार्ज मिळाला.

आपल्या आरोग्याकडे- गुडघे दुखी कडे दुर्लक्ष न करता
त्वरित तपासणी केल्यास उपचार शक्य असतात तसेच रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रिया ही अतिशय वेदनाविरहित व जोखीम शिवाय यशस्वीरित्या पार पडता येते असेही ते म्हणाले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group