जगभरात मंकीपॉक्सच्या प्रकरणांमध्ये मोठ्या वाढ होत आहे. दरम्यान आता भारतातही मंकीपॉक्स चा शिरकाव झाला आहे . देशात मंकीपॉक्स विषाणूचा पहिला रुग्ण सापडला आहे. देशात मंकीपॉक्स विषाणूचा रुग्ण सापडल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
दरम्यान , केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार, आंतरराष्ट्री य प्रवाशांनी आजारी लोकांसोबतजवळचा संपर्क टाळावा. याशिवाय आंतरराष्ट्री य प्रवाशांनी मृत किंवा जिवंत प्राण्यांसोबतचा जवळचा संपर्कही टाळावा.
तसेच , आंतरराष्ट्री य प्रवाशांनी आजारी व्यक्तीसोबतचा संपर्क टाळावा. त्वचेशी आणि खाजगी भागांतील जखमा किंवा आजार असलेल्या व्यक्तीशीही संपर्क टाळावा.आंतरराष्ट्री य प्रवास करणाऱ्या व्यक्तींनी क्तीं कोणत्याही जिवंत किंवा मृत सस्त प्राण्यासोबत संपर्क टाळावा. यामध्ये उंदीर, खार, माकड या प्राण्यांसोबत संपर्क टाळावा. असेही निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत .