भारताच्या खाद्यसंस्कृतीच इंटरनॅशनल रिपोर्टमध्ये कौतुक ; वाचा
भारताच्या खाद्यसंस्कृतीच इंटरनॅशनल रिपोर्टमध्ये कौतुक ; वाचा
img
Dipali Ghadwaje
भारताचा खाद्य उपभोग पॅटर्न G20 देशांमध्ये सर्वाधिक स्थायी आणि पर्यावरण अनुकूल आहे. लेटेस्ट लिविंग प्लॅनेट रिपोर्टच्या रिसर्चमध्ये ही बाब समोर आलीय.

इंडोनेशिया आणि चीन G20 अर्थव्यवस्थांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांचा डाएट पॅटर्न पर्यावरणाच्या दृष्टीने दुसऱ्या स्थानावर आहे. डाएट पॅटर्न हा पर्यावरण अनुकूल आहे. रिपोर्टमध्ये अमेरिका, अर्जेंटीना आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांच्या डाएट पॅटर्नला सर्वात खराब रँकिंग देण्यात आली आहे.

या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात फॅटी आणि शुगरी फूड्सच्या सेवनामुळे लठ्ठपणाची समस्या वेगाने वाढतेय. या देशांमध्ये जवळपास अडीच कोटी लोक ओव्हरवेट आहेत, असा रिपोर्टमध्ये इशारा देण्यात आलाय. 890 मिलियन लोक लठ्ठपणाने बाधित आहेत.

भारतात मिलेट्सबद्दल लोकांना ज्या प्रकारे जागरुक केलं जातय त्याचाही उल्लेख आहे. मिलेट्सच सेवन भारतात बऱ्याच काळापासून सुरु आहे. मिलेट्स सेवनासाठी भारतात अनेक अभियान चालवली जात आहेत. त्यात लोकांना मिलेट्स सेवनामुळे होणारे फायदे सांगितले जातायत.

भारतात मिलेट्स सेवनाच प्रमाण वाढवण्यासाठी कॅम्पने डिजाइन करण्यात आलं आहे. मिलेट्स आरोग्याबरोबर वातावरणासाठी सुद्धा उपयुक्त आहेत.

भारताचा पॅटर्न फॉलो करण्याचा सल्ला

2050 पर्यंत जगातील सर्व देशांनी भारताचाच डाएट पॅटर्न स्वीकारला, तर यामुळे वातावरण बदल वाढणार नाही. जैव विविधतेची हानी होणार नाही. नैसर्गिक साधनसंपत्ती बरोबर अन्न सुरक्षा धोक्यात येणार नाही असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
Health | food |
इतर बातम्या
Join Whatsapp Group