अंगणवाडीतील बालकांच्या जीवाशी खेळ..! पोषण आहारात आढळल्या अळ्या , कुठे घडला धक्कादायक प्रकार?
अंगणवाडीतील बालकांच्या जीवाशी खेळ..! पोषण आहारात आढळल्या अळ्या , कुठे घडला धक्कादायक प्रकार?
img
Dipali Ghadwaje
जळगाव :    शालेय पोषण आहारासंबंधी कायम तक्रारी समोर आल्या आहेत. निकृष्ट दर्जाचा पोषण आहाराचा पुरवठा हि कायमची समस्या असून यात अजूनही सुधारणा होत नसल्याचे पाहण्यास मिळत आहे. यात पुन्हा एकदा अंगणवाडीतील शालेय पोषण आहारात अळ्या आढळून आल्या आहेत. अर्थात अंगणवाडीतील बालकांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.  जळगाव शहरातील एका अंगणवाडीच्या पोषण आहारात आळ्या आढळल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , हरी विठ्ठल नगर भागात असणाऱ्या अंगणवाडीत ही घटना घडली असून यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे. तर अंगणवाडी सेविकांना वारंवार सूचना दिल्या जातात. या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांकडे असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

जळगाव शहरात हरिविठ्ठल नगरात बालविकास प्रकल्प अधिकारी अंतर्गत सुरू असलेल्या अंगणवाडी क्रमांक ६१ मध्ये दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या खिचडीत आळ्या आढळल्या. प्रकल्प अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करण्यात आली आहे. शिवाय, पोषण आहाराचा नमुना तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे. 

 बालविकास प्रकल्प अधिकारी अंतर्गत हरिविठ्ठल नगरात अंगणवाडी (क्र.६१) चालवली जाते. या अंगणवाडीत 50 बालके व बालिका येतात. बालकांसाठी श्री सद्गुरू महिला बचत गटाकडून आहार पुरवण्यात येतो. सकाळी अंगणवाडीतील बालकांना डब्यात पोषण आहारातील खिचडी देण्यात आली. कनिष्का बोरसे या मुलीच्या खिचडीत आळ्या आढळून आल्या आहेत.  

इतर बातम्या
Join Whatsapp Group